दिनेश आंबेकर
जव्हार : भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल जव्हार या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली.गुरुपौर्णिमा दिनाच्या निमित्ताने शाळेत स्पर्धा घेण्यात आल्या.जसे की श्लोक पठाण स्पर्धा इयत्ता दुसरी ते चौथी पर्यंत असेच ग्रीटिंग बनवण्याची क्रियाही पाचवी ते सातवी पर्यंत दिली आहे.यामध्ये सविस्त विषय देखील दिले आहेत.गुरु शिष्य परंपरा.आणि कुटुंब माझे पहिले गुरु.हे आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना दिले आहेत.तसेच आपल्या जीवनातील गुरुचे महत्व व ग्रंथ हेच गुरु तसेच.निसर्ग हाच गुरु.हे दिले आहेत.तसेच शाळेचे मुख्याध्यापक मा.डॉ.अर्जुन राठोडजी यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक कर्मचारी यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या!आणि मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले व सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानवंत व्हावे असा शुभ आशीर्वाद दिला.तसेच पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्याकडून सर्वोत्तम प्रतिभा मिळवण्यासाठी स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुख्याध्यापकांनी सर्व पालकांना मनःपूर्वक विनंती केली.आणि या कार्यक्रमाचे आयोजन कु.लीना जोशी आणि कु.मेहविश शेख यानी केले.तर सूत्रसंचलन कु.फिरदौस लुलानिया यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.कहकशा सय्यद यांनी केले.आणि सर्व कार्यक्रमाचे लेखन दहावीचे वर्गशिक्षक योगेश कुलकर्णीजी यांनी केले.गुरुपोर्णिमेचा उत्सव यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी योगदान दिले.तसेच या प्रसंगी मुख्याध्यापक,शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,जव्हार विक्रमगड मधील पत्रकार,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.