ईश्वर मुकणे –
जव्हार तालुक्यात कायरी नावाचं अत्यंत साधं आणि मागासलेल गाव आहे अशा गावात योजना पोचाव्यात लोकांची प्रगती व्हावी या उद्देशान शासन विविध योजना राबवत असत मात्र लोकांच्या साधेपणाचा फायदा घेत रोजगार सेवकाने कृषी योजना आणि घरकुल योजनेत घोटाळा करून अनेक लाभार्थ्याना गंडा लावला.ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक हे पद गावाची कामं व्हावी याकरिता असत मात्र इथ सेवकच भक्षक बनवा.फळबाग लागवडीमध्ये मस्टर काढताना लाभार्थ्याला विश्वासात न घेता आपल्याच नात्यातल्या लोकांची नावं देऊन काही रक्कम आपल्याकडे वळवली. गावकऱ्यांनी वेळोवेळी सूचना देऊनही सुधारणा झाली नाही म्हणुन गावकरी वळले जव्हार ग्रामीण पत्रकार संघटनेकडे!आमची फसवणूक झालीय पुरावे दाखवत त्यावर गुन्हा दाखव व्हावा हि मागणी केली.अरुण भोये असं रोजगार सेवकाच नाव आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करत शासन योजनेचा बट्याबोळ करत शासणाचीही फसवणूक केलीय की काय असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. जव्हार तालुक्यातील संपूर्ण रोजगार सेवक या घटनेमुळे नाराजी व्यक्त करत एकामुळे आम्हालाही डाग लागतो की काय अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झालीय.आत्ता जव्हार पंचायत समिती आणि कृषी विभाग काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
” प्रशासनाने या प्रकारची दखल घेत तपास सुरू केला असून दोषींवर कडक कारवाई होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.”(फळ लागवड लाभार्थी.कायरी ग्रामपंचायत.)












