जव्हार : दिव्य विद्यालय,गुलमोहर अंध मुलांची निवासी शाळा,जव्हार या शाळेतील ९ वर्षांचा कु.दिलीप दाणे हा विद्यार्थी जन्मतःअंध होता.या विद्यार्थ्याची आई नसून फक्त वडील आहेत.ते पण खूप दारू पितात.म्हणून ही सर्व जबाबदारी संस्थेने घेतली आहे.म्हणून या विद्यार्थ्याला संस्थेच्या प्रयत्नाने दृष्टी प्राप्त झाली.संस्थेचे आधारस्तंभ तसेच संस्थापिका प्रमिला कोकड यांच्या मेहनतीने आणि संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय बिमलजी केडिया यांची कन्या नेत्रतज्ज्ञ डॉ.सौ.श्रद्धा यांनी ही किमया केली आहे.२० विद्यार्थ्यांची तपासणी केली असता एका विद्यार्थ्याला दृष्टी प्राप्त होऊ शकेल असे डॉक्टरांनी सांगितले व त्यानुसार दिलीपच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.त्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने जन्मतःअंध दिलीप ला दिसण्यास सुरुवात झाली.आता दिलीप कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकतो,बघू शकतो आणि त्याच्या हालचालींमध्ये आत्मविश्वास दिसू लागला आहे.ही एक डॉक्टरांच्या सल्ल्याने झालेली शस्रक्रिया आहे.त्याच्यामुळे दिव्य विद्यालय शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
