उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
पालघर/जव्हार – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जव्हार यांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, नवीन जव्हार येथे धरती आबा जनभागीदारी अभियान अंतर्गत “एक झाड धरती आबांसाठी” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम व पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
दिनांक १९ जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाची सुरुवात माजी सभापती सौ. ज्योती हरिश्चंद्र भोये व तालुका व्यवस्थापक (पेसा) मनोज कामडी सर यांच्या हस्ते धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षारोपण करून करण्यात आली.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी घोषणाबाजी करत जव्हार परीसरात पर्यावरण जनजागृती रॅली काढली. रॅलीच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांचे जीवनातील स्थान यावर लक्ष वेधले गेले. यावेळी विद्यार्थिनींना पर्यावरण संरक्षणाबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
कार्यक्रमात गृहपाल सौ. पुष्पा विश्वनाथ जाधव, तसेच कर्मचारी सौ. ऊर्मिला वाघ, श्री. गणेश पाटील, श्री. दामू भोये, सौ. भारती सातपुते यांनीही सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण केले.
“एक विद्यार्थीनी – एक रोप” या संकल्पनेनुसार प्रत्येक विद्यार्थिनीने वृक्षारोपणात सहभाग घेतला. एकूण १५० वृक्ष लागवडीचा संकल्प या उपक्रमामधून कृतीत उतरविण्यात आला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जव्हार यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून भविष्यासाठी हिरवी शाश्वतता निर्माण करण्याचा सकारात्मक संदेश देणारा आहे.
