उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
पालघर/विक्रमगड: जिजाऊ अंध व मतिमंद मुलांच्या निवासी शाळा झडपोली या ठिकाणी मोठया उत्सहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात हि दिप-प्रज्वलाने करण्यात आली. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज व विधेची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.या वेळी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत हे स्वागत गीताने केले. विद्यार्थ्यांनी भाषणे केली.गुरूंची महती ही गाण्याच्या स्वरूपात गायली तसेच गोष्टी सांगितल्या. शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मतिमंद विद्यार्थ्यांनकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महेश गायकवाड होते तर मार्गदर्शन म्हणून अनिल राजपूत उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
