आंदोलन.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोळे यांचा ही आंदोलनात सहभाग.
संपादक – दिनेश आंबेकर
कासा : सरकारच्या विविध धोरणांविरोधात आजच्या देशव्यापी संपात सहभाग;मुंबई – अहमदाबाद हायवेवर रास्ता रोको आंदोलन.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका ही सातत्याने कामगार,शेतकरी,शेतमजूर व सामान्य जनतेच्या हिताची राहिलेली आहे.केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजप-महायुती सरकार मात्र जनभावना झुगारून देत विविध कायदे पारित करुन ते अंमलात आणण्याचा दडपशाही मार्गाने प्रयत्न करत आहे.याचाच निषेध म्हणून केंद्रीय कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या देशव्यापी संपात आज बुधवार,दि.9 जुलै 2025 रोजी एकत्र सहभागी झालो आणि चारोटी येथे सीटू (CITU) कामगार संघटनेच्या वतीने सरकारच्या विविध धोरणांचा निषेध म्हणून मुंबई-अहमदाबाद हायवेवर दोन तास रास्ता रोको करण्यात आला.शेतकरी,कामगार,शेतमजूर यांच्याविरोधातील कायदे रद्द करा, जाचक 4 कामगार कायदे रद्द करा या मागणीसह केलेल्या या रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात रास्ता रोकोत अंगणवाडी मदतनीस,रिक्षा चालक-मालक संघटना यांनी देखील सहभाग नोंदवला.कॉ.रडका कलंगडा डहाणू तालुका सेक्रेटरी,कॉ.लक्ष्मण डोंभरे तलासरी तालुका सेक्रेटरी,कॉ.लहानी दौडा जनवादी महिला संघटना सेक्रेटरी,कॉ.नंदकुमार हाडळा डीवायएफआय संघटना राज्याध्यक्ष आदींसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच शेतकरी,कष्टकरी,शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.














