महाराष्ट्र भूषण ति.डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्ष लागवड व संवर्धन अभियान”
दि. ८/७/२०२५ रोजी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने एक भव्य वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले.या अभियानाचा उद्देश निसर्गसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपणे हाच होता.हि उपक्रम महाराष्ट्र भूषण ति.डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आली.त्यांच्या विचारांना अनुसरून,समाजात पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी व प्रत्यक्ष कृतीस प्राधान्य देण्यासाठी जव्हार शहरातील हनुमान पॉईंट,जय सागर डॅम अश्या विविध भागांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.या अभियानात शेकडो सदस्य,स्थानिक नागरिक,शाळा-महाविद्यालयातील सदस्य विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी जव्हार पोलीस स्टेशन चे पी आय मुर्तडक आणि मान्यवरांनी सहभाग घेतला.पेरू,काजू, पिंपळजांभूळ,चिंच,बांबु,हिरडा,आवळा,बेहडा,मोह,उंबर,पेरु, वड,बहवा,अर्जुन सादडा,पांढरी काटे सावर,कडुलिंब अशा विविध औषधी,फळ झाडे व सावली देणाऱ्या एकुण ७५० वृक्षांची लागवड,विविध प्रकारचे स्थानिक झाडांचे रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला वृक्ष लागवडीसाठी टिकाव,फावडे,पहार अशा विविध साहीत्यासह श्रीसदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन मा.मुतडक,पो.नि.जव्हार, ज्योती भोये,अध्यक्षा भा.ज.पा.महीला आघाडी, सचिन सटाणेकर,भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष,विठ्ठल थेतले,जव्हार शहर अध्यक्ष राजु अंभिरे, प्रमोद मौळे पत्रकार यांचे प्रमुख उपस्थित तसेंच प्रतिष्ठानच्या प्रमुख मार्गदर्शकांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,झाडे लावणे ही एक गोष्ट आहे,पण ती टिकवणे व त्यांचे संगोपन करणे हीच खरी जबाबदारी आहे.हे अभियान हे नानासाहेबांच्या पर्यावरणपूरक विचारांचा विस्तार आहे.”यापुर्वी जव्हार येथील हनुमान पॉईंट,सन सेट पॉईंट, जय सागर धरण या परिसरात ही डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा,ता.आलिबाग यांचेमार्फत वृक्षलागवड करण्यात आलेली असून त्यांचे सवंर्धनाचे काम प्रतिष्ठानाचे श्रीसदस्य नियमित करतांना दिसून येतात, त्यामुळे लागवड केलेल्या वृक्षांचे चांगल्या प्रकारे जतन झाल्याने परिसरातील वातावणामध्ये चैतन्यता दिसून येत आहे.जव्हार ला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असल्याचे या सोनेरी धुके, झाडांची हिरवे गार वारा सोंदर्य पर्यटन स्थळावर विविध पर्यटक त्याठिकाणी येत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत आहेत.अशा प्रकारचे अभियान समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी अत्यंत आवश्यक असून,डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत.