जव्हार : जव्हारमध्ये २४ तासांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाने नदी,नाले ओसंडून वाहत आहे.सर्वत्र जलमय दृश्य दिसत आहे. जव्हार च्या कशिवली घाटात सर्वत्र दाट धुके पसरले आहे.धुक्यामुळे रस्ते दिसेनासे झालेले आहेत.जव्हार तालुक्यात जव्हार मंडळ १९३ मी.मी, साखरशेत १४२ मी. मी तर जामसर १३६ मी.मी असे सरासरी १५७ मी.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.तसेच शनिवार,रविवार पावसाचा जोर कायम आहे.तालुक्यात पावसाची संततधार जोरात सुरू आहे.पावसामुळे पिंपळशेत खरोंड्यापैकी माड विहिरा व हुबरण रस्ता बंद झाला आहे.गेल्या दोन वर्षापुर्वी दि.२७ जुलै २०२३ रोजी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे येथील जुना पाईपडिप वाहुन गेला होता.मात्र या ठिकाणी छोटा पुल बांधणे आवश्यक होते गेल्या दोन वर्षांत या पुला बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग या भागातील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष न घातल्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता बंद होऊन शाळेत जाणारे विद्यार्थी,आजारी रुग्ण व नागरिकांचे हाल होत आहेत.गेल्या दोन दिवसांपासून रस्ता बंद असुन प्रशासनाने या ठिकाणी तात्पुरती उपाय योजना केलेली नाही.जव्हारच्या परिसरात अनेक लहानमोठे धबधबे आहेत.त्यांनी मुसळधार पावसामुळे रूद्र रुप धारण केले आहे,त्यामुळे या धबधब्यांवर खाली उतरण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.
जाहिरातीसाठी संपर्क – मुख्य संपादक – दिनेश बा आंबेकर – 9022059782