जव्हार : वेदांता हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर,सासवंद पोस्ट. धुंदलवाडी यांच्या वतीने जव्हार पोलीस स्टेशन येथे आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन.0५ जुलै २०२५ रोजी वेदांता हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर सासवंद (धुंदलवाडी) यांच्या वतीने जव्हार पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरात सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.तपासणीमध्ये रक्तदाब,मधुमेह,हृदयाचे आरोग्य,बीएमआय,डोळ्यांची व मानसिक आरोग्य तपासणी यांचा समावेश होता.तपासणीसह,धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे लक्ष देण्याचे महत्त्व,आहार,व्यायाम व तणाव व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमासाठी जव्हार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.विजय मुर्तडक व त्यांचे सर्व सहकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.त्यांच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम अधिक प्रभावी ठरला.या शिबिराचे आयोजन मेजर कैलास राठोड यांच्या समायोजनाने करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वी संचालन वेदांता हॉस्पीटल चे असिस्टंट मेडिकल सुप्रिडेंट डॉ.मुकुंद खंडेलवाल जी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.सर्व डॉक्टर,नर्सिंग स्टाफ,कॅम्प समन्वयक,आणि एम एस डबलू टीम यांनी या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले.हा उपक्रम केवळ वैद्यकीय तपासणीपुरता मर्यादित न राहता,पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण आरोग्य जपणुकीचा आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.पोलीस आरोग्याचा जागर.वेदांता हॉस्पिटलचा उपक्रम जव्हारमध्ये यशस्वी…
