दिनेश आंबेकर
आज भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल चालतवड येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.सर्व मुलांनी वारकरी संप्रदायाचा वेशभुषा करून,टाळ मृदूंग च्या तालावर,अभंग गात, वीठू माऊलींची पालखी सजवून,तुळशी कुंड डोक्यावरती घेऊन,नाचत गाजत, फुगडी खेळ खेळत शाळेत विठू माऊलीची दिंडी काढण्यात आली.त्यानंतर सर्वजण वर्गात जमलो त्यानंतर भगवंत विठ्ठलाची पांडुरंगाची आरती घेण्यात आली व श्रीफळ फोडून मुर्तीची पुज्या करण्यात आली त्यानंतर सर्व शिक्षकांनी एक टाळ मृदुंगाच्या तालावर सुंदरशा अभंग गाईला व त्यानंतर आषाढी एकादशी चे महत्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शित करण्यात आले त्यामध्ये भगवंत विठ्ठलाची कथा भक्त पुंढलीकाची कथा सांगण्यात आली.याप्रकारे वारकरी संप्रदायातील हिंदू धर्मातील सर्वांत महत्वाचा सुंदर सा सण साजरा करण्यात आला.तसेच शिक्षकांनी आपल्या मुलांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले.आषाढी एकादशीला खूप महत्व आहे.या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात आणि उपवास करतात.या दिवशी वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने जातात.आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, कारण या दिवशी भगवान विष्णूंची योगनिद्रा सुरू होते,असे मानले जाते.या दिवसापासून चातुर्मास देखील सुरू होतो, ज्यामध्ये शुभ कार्ये करणे टाळले जाते.आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करणे आणि उपवास करणे शुभ मानले जाते.या दिवशी व्रतवैकल्ये केल्याने मनोकामना पूर्ण होतात,असे मानले जाते. आषाढी एकादशीला वारकरी पंढरपूरला पायी जातात.विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो लोक या वारीत सहभागी होतात.आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो.या काळात शुभ कार्ये करणे टाळले जाते, कारण भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, असे मानले जाते.आषाढी एकादशीचे व्रत केल्याने पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते,असे मानले जाते.आषाढी एकादशीचे व्रत केल्याने मानसिक शांती लाभते आणि शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते,असेही मानले जाते.आषाढी एकादशीच्या वारीमुळे समाजात समता आणि एकोपा वाढतो,असे मानले जाते.आषाढी एकादशीला काय करावे,उपवास करावा,विठ्ठलाची पूजा करावी,विठ्ठलाचे नामस्मरण करावे,गरजूंना दानधर्म करावा, भजन-कीर्तनात सहभागी व्हावे.असे सांगून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.