सौरभ कामडी
मोखाडा : शैक्षणिक वर्षातील पहिली केन्द्रस्तरिय शिक्षण परिषद.जिल्हा परिषद ISO शाळा कोचाळे येथे उत्साहात संपन्न झाली,शिक्षकानं मध्ये सुसंवाद साधावा,नवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती व्हावी,शैक्षणिक नवप्रवाहाना चालना मिळावी आणि विद्यार्थी गुणवत्तेत भर पडावी या साठी दर महिन्याला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून केंद्रस्तरावर शिक्षण परिषदांचे आयोजन केले जाते.मोखाडा तालुक्यातील किनिस्ते केंद्राची शिक्षण परिषद पुष्प पहिले आज कोचाळे येथे पार पडले,शिक्षण परिषदेचे उद्दिष्टे सांगणारी सुंदर रांगोळी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने रेखाटली होती.शिक्षकांसाठी सुंदर सेल्फिपॉइंट ही शाळेने तयार केला होता,उपस्थितांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थिनींनी सुमधुर इशस्तवन आणि स्वागत गीतांनी केले.शाळेच्या वतीने उपस्थित सर्व शिक्षकांना नोट पॅड आणि पेन,गुलाब पुष्प देवून स्वागत केले.आजच्या शिक्षण परिषदेचा महत्त्वाचा विषय असलेल्या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थी अध्ययन क्षमता निश्चिती या विषयावर चर्चा करण्यात आली.संपूर्ण शिक्षण परिषदचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक गणेश वाघ यांनी केले परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनात शिक्षक राजाराम जोशी,दिनेश ठोमरे यांनी मेहनत घेतली,मोखाडा तालुका गटशिक्षणाधिकारी वसंत महाले,किनिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख भरत गारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषद पार पाडली.
जाहिरातीसाठी संपर्क – मुख्य संपादक – दिनेश बा आंबेकर — 9022059782