मोखाडा : स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा प्रदीप वाघ आज वाकडपाडा हायस्कूल येथे आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व पत्रकार संघ मोखाडा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी विद्यार्थ्यांनासंबोधित करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रदीप वाघ यांनी सांगितले की स्पर्धेच्या युगात गुणवत्ता पुर्ण शिक्षण काळाची गरज आहे.आणि त्या साठी अभ्यास महत्त्वाचा आहे.दहावी बारावी नंतर च आयुष्यातील बदलाला सुरवात होते आणि तो बदल यशस्वी करण्यासाठी अस घवघवीत यश मिळाले आहे या संधीचा फायदा घ्या.आपल्या या यशा मुळे तुमच्या आई वडील आणि आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार प्रदीप वाघ यांनी गुणवंत विद्यार्थी बद्दल कौतुक करताना काढले.आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबवित असुन मागील वर्षा पासून मोखाडा तालुका पत्रकार संघ देखील या स्तुत्य उपक्रमात सहभागी झाला आहे.यावेळी दहावी बारावी परीक्षेत वाकडपाडा हायस्कूल येथुन प्रथम तिन क्रमांक मिळवुन उत्तीर्ण झालेल्या 13 विद्यार्थ्यांना सन्मान पत्र,पुष्पगुच्छ व शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष व समीतीचे अध्यक्ष प्रदीप वाघ,समिती सदस्य सरपंच नरेंद्र येले,उपसरपंच नंदकुमार वाघ,पोलिस पाटील विठ्ठल गोडे,माजी सरपंच संजय वाघ,सदस्य भारत बुधर,शाळेचे अधिक्षक चुनीलाल पवार,मुख्याध्यापक ठवरे,शेजवळ,पांडवीर,चौधरी,झुगरे,गुणवंत विद्यार्थी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव संजय वाघ यांनी केले.
जाहिरातीसाठी संपर्क – मुख्य संपादक -दिनेश बा आंबेकर – 9022059782