उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
पालघर – पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम जव्हार शहरात बस स्थानक परिसरात भर पावसात मंगळवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सुरू होती.या वेळी जवळपास २५ टपऱ्या ,हातगाडे ,रस्त्यावरील दुकानावर जेसीबी चालवत अनेकांची अतिक्रमणे काढण्यात आली .
या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .त्यामुळे शहरातील अतिक्रमधारकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.स्वच्छ आणि सुंदर अशा जव्हार शहरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहराचा श्वास कोंडत होता .अतिक्रमण हटाव यासाठी प्रशासनाने शेकडो तक्रारी करण्यात आल्या होत्या.मात्र कारवाई होत नव्हती तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावून अतिक्रमणे काढून घेण्याचे आव्हान करण्यात आले होते .दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेच्या वतीने विशेष पथके स्थापन करण्यात आली होती.
जव्हारच्या बसस्थानक रस्ता व बायपास रस्ता या ठिकाणी असलेली अतिक्रमणे काढण्यात आली.दरम्यान नगर परिषदेने राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम विरोधात अतिक्रमण धराकांमध्ये नाराजी दिसून आली,तर नागरिकांमध्ये या कारवाईचे स्वागत करण्यात आले,बसस्थानक रस्त्यावरून जात असताना एसटी बसला तसेच इतर वाहनांना मोठा अडथळा येत होता. तसेच दोन गाड्या पास करण्यास खूप अडचण होत होती .अतिक्रमण काढल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
