
उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
पालघर – डहाणू तालुक्यातील कासा परिसरात महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे पुन्हा एकदा गंभीर प्रकार घडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. बरडपाडा येथे सकाळी साडेसातच्या सुमारास कामावरून परतणाऱ्या एका युवकावर थेट वीजवाहक तार कोसळली. मात्र प्रसंगावधान राखून त्या युवकाने जीव वाचवला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.योगेश जगताप असे संबंधित युवकाचे नाव असून, तो नेहमीप्रमाणे कामावरून मोटारसायकलवर घरी येत होता. दरम्यान, अचानक वीजवाहक तार त्याच्या मोटारसायकलवर पडली. प्रसंगाची तीव्रता लक्षात घेऊन त्याने तात्काळ बाईकवरून उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला. ही तार गाडीच्या हँडलमध्ये अडकल्याने बाईक थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी महावितरण विभागाला तात्काळ माहिती दिली. काही वेळातच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, ही घटना अपघात नसून महावितरणच्या हलगर्जीपणाचे परिणाम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. लोकवस्ती असलेल्या या परिसरातून दररोज शाळकरी मुले, कामगार आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. अशा ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा हा गंभीर धोका असल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागात अनेक ठिकाणी वीजतारा झाडांमध्ये अडकलेल्या किंवा रस्त्याजवळ झुकलेल्या स्थितीत आहेत. महावितरणकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. उद्या एखाद्या मोठ्या अपघातात कुणाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ सागर पवार यांनी उपस्थित केला आहे.या घटनेनंतरही महावितरणकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. वारंवार अशा घटना घडत असतानाही दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महावितरण विभागाने तातडीने या भागातील धोकादायक वीजतारा तपासून योग्य ती दुरुस्ती करावी आणि भविष्यातील धोके टाळावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई न केल्यास नागरिकांतून तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
संपूर्ण बातमी पाहण्यासाठी👆👆वरील लिंक वर क्लिक करा.
👆👆👆👆👆👆👆👆👆
आपलं पालघर न्यूज नेटवर्क
मुख्य संपादक : दिनेश आंबेकर
9022059782
उपसंपादक : प्रशांत दाव्हाड
8408845264
=======================
*संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नियुक्ती चालू आहे त्वरित संपर्क साधावा* ======================
जाहिराती आणि बातम्यांसाठी संपर्क साधा : 9022059782.8408845264
धन्यवाद✍️🙏🖥️🎥🎤
*बातम्या शेअर करा*