दिनेश आंबेकर –
आज पाठवेन दि.01/07/2025 रोजी पंचायत समिती विक्रमगड येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.कै.वसंतरावजी नाईक साहेब यांच्या 112 व्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला.वसंतराव नाईक साहेब यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी – सन 1969, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 1971, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली 1972,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी 1972 समान न्याय देणारे कृषी विद्यापीठ देवून वसंतरावजी नाईक साहेब शेतकऱ्यांचे दैवत झाले,आज या विद्यापीठातून हजारो विद्यार्थी शेतीविषयक शिक्षण घेवून प्रशासनात, शेती,व्यावसायात प्रगती केलेली आहे,ही नाईक साहेबांची देण आहे.आज त्यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमाला विक्रमगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुयर मोगल गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले,तालुका कृषी अधिकारी जगदीश दोंदे साहेब,कृषी अधिकारी सुनील पारधी,पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद भोईर,मंडळ अधिकारी इंगळे प्रभारी कृषी अधिकारी चंद्रकांत गहे,विस्तार अधिकारी मनोहर जाधव,प्रगतशील शेतकरी किरण लेले व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ व मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते.
जाहिरातीसाठी संपर्क – मुख्य संपादक -दिनेश बा आंबेकर – 9022057982