दिनेश आंबेकर
जव्हार,२८ जून २०२५:जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा देवी यांची दुसरी भव्य रथयात्रा आज जव्हार नगरीत “याची देही,याची डोळा”या दिव्य अनुभूतीसह अत्यंत भक्तिभावात पार पडली.पुरीचे चार धामांपैकी एक असलेले जगन्नाथधाम आता जव्हारमध्येही प्रकट होत आहे,आणि या प्राचीन परंपरेचा महिमा इथेही दिसून येत आहे.
✨ शोभायात्रेचा मार्ग आणि आयोजक.✨
रथयात्रेची सुरुवात राजे यशवंतराव मुकणे महाराज यांचा पुतळा येथून झाली.रथाने राम मंदिर आणि प्रगती प्रतिष्ठान मार्गावरून नगरपरिक्रमा केली.रथ ओढताना गावकऱ्यांनी, महिलांनी आणि लहान मुलांनी भक्तिरसात न्हालेलं वातावरण निर्माण केलं.या कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (ISKCON) – गोवर्धन इको व्हिलेज आणि जव्हारमधील स्थानिक भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
📜 जगन्नाथ कोण?✨
अतिशय सोप्या, समर्पक भाषेत अभय गौरांग प्रभूंनी जगन्नाथ, बलराम व सुभद्रादेवी यांच्या स्वरूपाचे विवेचन केले.आध्यात्मिक जीवन कसे सोपे,आनंददायी आणि आवश्यक आहे हे पटवून दिले.भाविक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
🎶 सांस्कृतिक,भक्तीमय कार्यक्रमरथयात्रा मार्गावर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम,गीत-नृत्य सादर झाले.महिला भक्तांची विशेष गर्दी हे यंदाचे वैशिष्ट्य ठरले.सर्वत्र हरिनाम संकीर्तन:”हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरेहरे राम हरे राम राम राम हरे हरे”या महामंत्राच्या गजरात मृदंग, करताल व अन्य वाद्यांच्या तालावर भाविकांनी आनंदात नृत्य केले.
🍛 ५६ भोग व महाप्रसाद🍛
रथ प्रगती प्रतिष्ठान येथे पोहोचल्यावर श्री जगन्नाथ,बलराम,आणि सुभद्रा माई यांना ५६ भोग अर्पण करण्यात आले.त्यानंतर भावपूर्ण महाआरती पार पडली. सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
👥 मान्यवरांची उपस्थिती व सहकार्यकार्यक्रमास माननीय आमदार भोये साहेब यांची उपस्थिती होती.पोलीस प्रशासन, नगरपरिषद,वीज विभाग व स्थानिक नागरिकांनी अनुकरणीय सहकार्य केले. ISKCON तर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.
🌿 सत्संग आणि पुढील उपक्रमकार्यक्रमाच्या शेवटी,दर गुरुवारी होणाऱ्या सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
🛕 भाग घेतलेले गावया दिव्य यात्रेत मोखाडा, खोडाळा, पाथर्डी, डोहरे पाडा, साकुर आदी गावांतून अनेक हरिभक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला.
🌺 समारोपपूर्ण रथयात्रा अतिशय शिस्तबद्ध व भक्तिपूर्ण पद्धतीने पार पडली.जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे — हीच भाविकांची आर्त प्रार्थना.
जाहिरातीसाठी संपर्क – मुख्य संपादक -दिनेश आंबेकर – 9022059782