प्रशांत दाव्हाड
जव्हार – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ (अकादमी) भारत सरकार मान्यता प्राप्त वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत बाबुराव किसन आंबेकर यांचे पुत्र मा.दिनेश बाबुराव आंबेकर याने प्रथम श्रेणी मध्ये यश संपादन केले.त्याबद्द्ल सदरील संस्थेचे संस्थापक महेंद्र देशपांडे तसेच कृत्तिका देशपांडे/मराठे यांचा सहनीसी सदरील प्रमाणपत्र दिनेश आंबेकर यांना प्रदान करण्यात आले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व भागातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
” पत्रकारिता पदविका कोर्सचा माझा अनुभव पत्रकारिता क्षेत्राविषयी माझे विशेष आकर्षण असल्याने मी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर संघ संचलित पत्रकार पदविका कोर्स पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.हा कोर्स माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरला.पत्रकारितेची मूलतत्त्वे,वृत्तलेखन,संपादन,मुलाखत तंत्र,माध्यमांचे बदलते स्वरूप तसेच डिजिटल पत्रकारितेची वाढती भूमिका याविषयी सखोल ज्ञान मिळाले.या अभ्यासक्रमात सौ.कृतिका देशपांडे मदतीमुळे विविध पत्रकारितेच्या कौशल्यांवर मराठे यांचे मार्गदर्शन मला फार मोलाचे ठरले.त्यांच्या माझी पकड अधिक दृढ झाली.प्रत्यक्ष लेखन,मुलाखती घेणे आणि वृत्तसंकलन यासारख्या गोष्टींवर त्यांनी दिलेले मार्गदर्शन माझ्यासाठी अत्यंत उपयोगी ठरले.कोर्सदरम्यान विविध चर्चासत्रे,कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके यांच्या व्हिडिओज मुळे माझा आत्मविश्वास वाढला.पत्रकारितेतील नैतिकता, जबाबदारी आणि सत्यतेचे महत्त्व याची जाणीव झाली.वृत्तपत्राला जगाचा एक दिवसाचा इतिहास असे म्हणतात.या इतिहासाचा मी सुद्धा एक भाग होऊ शकतो.याची जाणीव या पत्रकारिता पदविका कोर्समुळे झाली.हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याने मला पत्रकारितेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास मिळाला आहे.या संधीसाठी मी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर संघाचे मनःपूर्वक आभार मानतो.तसेच,या प्रवासात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या सौ.कृतिका देशपांडे मराठे आणि इतर सर्व टीम चे मनःपूर्वक आभार ! त्यांच्या मदतीमुळे मी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो.भविष्यात या क्षेत्रात योगदान.
आपला एक नवीन पत्रकार. दिनेश बाबुराव आंबेकर.