दिनेश आंबेकर
जव्हार : जव्हार येथील पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत रुग्णवाहिकेची आवश्यकता होती,त्याकरिता येथील रुग्णालयातून मुंबई बोरिवलीच्या पूर्व रोटरी क्लबकडे मागणी केली असता,ती मंजूर होऊन,गुरुवारी सकाळी ११ वाजता जव्हार रुग्णालयाच्या प्रांगणात खासदार डॉ.हेमंत सवरा यांच्या हस्ते रिबीन कापून आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी,पालघर चे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रामदास मराड,सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.अपूर्वा बासुर,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.किरण पाटील,पतंग शाह उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय कावळे,जव्हार पोलिस ठाणे प्रभारी विजय मुतडक यांची विशेष उपस्थिती लाभली.यावेळी सामाजिक दायित्व विभागाकडून मोमेंटिव्ह परफॉर्मन्स मटेरियल्स प्रायव्हेट लिमिटेड चे शुभम त्रिवेदी,पराग राऊत,रेजित नायर,चंदन बागुल हे दाखल झाले होते,तर मुंबई बोरिवली पूर्व शाखेचे, अध्यक्ष तुलसीदास सावंत,माजी अध्यक्ष गिरीश मित्तल,प्रकाश निर्मल,देवेंद्र भट,हिरालाल पटेल,रिता लोपेज आदी उपस्थित होते दरम्यान,खासदार डॉ.सवरा यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक दातित्व विभागाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या,शिवाय आमदार भोये यांनी देखील जव्हारच्या रुग्णसेवेत एक चांगले उपकरण दखल झाल्याने येथील आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होईल असे गौरवोद्गार काढले.यावेळी सामाजिक क्षेत्रात विविध प्रकारे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते,भाजपच्या वतीने कुणाल उदावंत,संतोष चोथे आणि भाजपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जाहिरातीसाठी संपर्क – मुख्य संपादक -दिनेश आंबेकर -9022059782