उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
जव्हार – जव्हार तालुक्यातील झाप ७७ महामार्गावरील पोंढीचापाडा पुलाची उंची वाढवावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून निरनिराळ्या स्तरातून मागणी केली जाते.परंतु प्रशासन केवळ टोलवाटोलविचे उत्तरे देत तांत्रिक अडचणी सांगत असल्याची येथील ग्रामस्थांनी माहिती दिली आहे .तसेच प्रत्येक जनता दरबारात तक्रार करून सुद्धा; अद्यापही पोंढीचापाडा झाप जव्हार ७७ महामार्गावरील पुल पाण्याखालीच पाहायला मिळत असल्याने येथील ग्रामस्थांना पडला प्रश्न? आता या पुलाची तक्रार करायची तरी कुठे.यामुळे येथील नागरिक आता खूप संतापले आहेत.
पोंढीचापाडा पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावर असणाऱ्या अनेक गावं पाड्यांचा संपर्क तुटत असतो.यामध्ये ५ ग्रामपंचायती ,१ प्राथमिक आरोग्य केंद्र,८ पथके,२ आश्रमशाळा ,३५ जिल्हा परिषद शाळांचे मार्ग बंद होत असल्याने शिक्षणाचे तीन तेरा वाजत असतात.या वर पर्यायी रस्ता नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे .गेल्या अनेक दशकापासून ही समस्या असताना देखील येथील प्रशासन व लोकप्रतिनिधी कडून या भागाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे येथील वृध्द नागरिक सांगत आहेत.
२३ जुलै २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार, तहसीलदार कार्यालय जव्हार,गटविकास अधिकारी पंचायत समिती जव्हार,यांना पोंढीचापाडा येथील पुलाच्या समस्या बाबत निवेदन दिले होते मात्र त्यावर अजून काहीही उपाययोजना झाली नसल्याचे येथील नागरिक बोलतात .तसेच गेल्या वर्षी जनता दरबारात या समस्येबाबत तक्रार केली असता .सदरचा पुल नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव जुलै २०२४ अर्थसंकल्पात सादर करण्यात आले होते. तथापि त्यास प्रशासकीय मान्यताप्राप्त झाली नाही .असे उत्तर मिळाले असे सामाजिक कार्यकर्ता सोमनाथ टोकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा २० फेब्रुवारी २०२५ झालेल्या जनता दरबारात पोंढीचापाडा पुलाची उंची वाढावी म्हणून निवेदन देण्यात आले आहे.त्यामुळे आता तरी याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे असे येथे नागरिकांची मागणी आहे.
कोट
पोंढीचापाडा फुलाची उंची वाढावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून मागणी केली जात आहे परंतु सरकारी बापू आणि लोकप्रतिनिधींनी नकार घंटामुळे येथील जनता विकासापासून कोसो दूरच राहिली आहे. पायाभूत सुविधा करिता साधा रस्ता या भागात बनवता येत नाही.
-एकनाथ दरोडा ,सरपंच झाप
पोंढीचापाडा या फुलाची उंची वाढावी म्हणून
प्रत्येक जनता दरबारात तसेच वेगवेगळ्या पद्धतीने शासन दरबारी या समस्येबाबत निवेदन देऊन सुद्धा अद्यापही पोंढीचापाडा झाप जव्हार ७७ महामार्गावरील पुल पाण्याखालीच बघायला मिळत आहे त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधी व शासनाने याकडे वेळेत लक्ष वेधून नागरिकांना न्याय द्यावा.
-सोमनाथ टोकरे सामाजिक कार्यकर्ता
