२० वर्षातून कालव्याला एकच वेळा पाणी,शेतकऱ्यांची आमदार हरिश्चंद्र भोये कडे तक्रार.
दिनेश आंबेकर –
जव्हार : लघु पाठ बंधारा योजनेतून, येथील स्थलांतरीत गोरगरिब शेतकऱ्यांच्या उन्हाळी शेतीकरिता मृद व जलसंधारण विभाग ठाणे, महाराष्ट्र शासनाने पिंपूर्णा लघुपाटबंधारे योजनेतून करोडो रुपयांचा खर्च करून,पिंपूर्णा लघु पाठ बंधारा,धरण बांधण्यात आले आहे.मात्र ह्या धरणातील काहीच फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत,ह्या गावांना जूनच्या अखेरीस भीषण पाणी टंचाईचा संघर्ष दरवर्षी करावा लागत असल्याचे येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सांगितले,शेतकऱ्यांनी आमदार हरिश्चंद्र भोये यांच्याकडे तक्रार केली आहे.ह्या पिंपूर्णा लघुपाटबंधा-यांचे शेतकऱ्यांना कालव्याचा काहीच फायदा नसल्याचे सांगितले आहे,धरणातील पाणी २० वर्षातून कालव्याला एकाच वेळा पाणी सोडल्याचे सांगितले.त्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा पाट देखील गायब झाला आहे,मात्र आता पाऊस सुरू झाला की त्या बांधा-यातील करोडो लिटर्स पाणी जाणार वाया,याकडे आताच लक्ष घालून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे अशी मागणी आमदारांकडे त्या भागातील ग्रामस्थ,शेतकऱ्यांनी केली आहे.जव्हार तालुक्यातील पिपूर्णा लघुपाटबंधारे योजने अंतर्गत धरणाचे बांधकाम होवून,जवळपास २० वर्षात एकाच वेळा,पाटाला पाणी सोडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले,जून महिन्यानंतर त्या भागातील वडोली,दाभोसा,पिपूर्णा, चिरेचापाडा,ह्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जानवायला लागल्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले,तसेच धरण भागातील ह्या गावांना मे अखेरीस पिण्याचा पाण्याचा सामना करावा लागतो,मात्र ह्या आदिवासी शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या गावातील आमदार झाल्याचे सांगत आमदारांकडे लेखी तक्रार केली आहे. पिंपुर्णा धरणाच्या,पाटाची दुरुस्ती दरवर्षी केली जाते,मात्र प्रत्यक्षात त्या पाटात,पाणीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही.त्यामुळे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत नाही.शेतीसाठी पाण्याची टंचाई कायम असून, शेतकरी अजूनही शेतीसाठी पावसावरच अवलंबून आहे.सरकारी निधी खर्च करूनही जर पाणीच न मिळाले,तर अशा योजनेचा उपयोग काय? प्रशासनाने योजनेचा आढावा घेऊन पुढील वर्षी तरी शेतकऱ्यांना बांधा-यातील पाणी द्यावे अशी मागणीने.मृद व जलसंधारण विभाग ठाणे,महाराष्ट्र शासनाने,पिपूर्णा लघुपाटबंधारे योजना अंतर्गत,दमण गंगा खोरे अंतर्गत जव्हार तालुक्यातील पिंपूर्णा गावाच्या वरती चालतवड गावाजवळ लेंडी नदीवर उपयुक्त जल साठ्याकरिता शेतकऱ्यांच्या हितकरीता पिंपूर्णा धरण बांधण्यात आले असून, धरणाची लांबी २,३६ मीटर असून, उंची १७.४५ मीटर आहे.यामुळे जलश्रोताची लांबी ७७.५० मीटर आहे.यामुळे या धरणात सध्याही जून अखेरीस मोठा पाणी साठा आहे. मात्र कालव्याला पाणी सोडले जात नसल्याने, कालव्या खालील गाव सध्या पाणी टंचाईच्या झळा सोषत आहेत. कालव्याची लांबी,उजवा कालवा ६ की.मी. व डावा कालवा ०.२७० घन मी. सेमी आहे,धरणातील पाण्याचा शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा होणार आहे.शेतकरी शेतीकरिता लाभक्षेत्र शेतीयोग्य क्षेत्र १७६ हेक्टर असून,सिंचन क्षेत्र १६८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे,मात्र महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील आदिवासी गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी धरणातील पाण्यापासून मुकावे लागते,त्यामुळे पाऊस सुरू झाला की त्या धरणातील एवढा मोठा पाणी साठा वाया जाईल,पिपूर्णा धरणातील लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत पाटातून पाणी सोडले जात नसल्याने,या योजनेच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. योजनेच्या स्थापनेचा उद्देश सिंचन सुविधा देणे हा असला,तरी प्रत्यक्षात पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे शेतकरी पावसावर अवलंबून आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
” या पिंपूर्णा भागातील शेतकऱ्यांनी एवढ्या वर्षानंतर माझ्याकडे तक्रार केली,हा त्यांच्या शेतीचा मोठा मुद्दा असून,त्या धरणातील पाणी त्या पाटाला कधीच सोडले नाही,ह्या पाटा लागत शेती करणारा शेतकरी शेती करायला तयार आहे,मात्र धरणातील पाणी सोडले जात नाही.ही शेतकऱ्यांची गंभीर बाब कडे आमचे लक्ष असेल,”
विक्रमगड विधानसभा आमदार – हरिश्चंद्र भोये.
” “आम्ही शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा पाठ बंधारा विभागाकडे तक्रार करूनही पाटाला पाणी सोडले जात नाही,ही दरवर्षीची परिस्थिती आहे, आम्हाला जून महिना उजाडला की गावात पाणी समस्या जाणवते, गावातून धरणांचा पाट जातो पण काय फायदा,याकडे लक्ष घालावे. पिंपुर्णा गाव,शेतकरी.”- गणपत हिरकुडा.