उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – अलर्ट सिटीजन फोरम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय मा.श्री.निरंजन दादा यांच्याकडून जि.प.उच्च.प्राथ शाळा डोल्हारी बुद्रूक शाळेतील इ.1ली ते 8 वी पर्यंत एकूण 197 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विक्रमगड तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.प्रभू पाचमासे , दादडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.किरण रोडे,तसेच डोल्हारी बुद्रूक शाळेचे मुख्याध्यापक श्री.विलास चौधरी ,शा.व्या.समिती अध्यक्षा सौ.गीतांजली सापटा , श्री.संतोष उमतोल , श्री.प्रशांत महाले श्री.विनोद , श्री.चंद्रकांत भुसारा, सौ.ठाकरे , श्री.विष्णू उमतोल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
