दिनेश आंबेकर
जव्हार : भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल चालतवड येथे प्रिन्सिपल जोशना जी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिनानिमित्त,जव्हार तालुक्यातील भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल चालतवड येथे योगाभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी योगासने करून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रिन्सिपल जोशना,हरेशजी,हर्षला,किरण,गीता,रोहित,मालती,करण,प्रणाली.यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 60/70 विद्यार्थ्यांना विविध योगासने व श्वसन तंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले.विद्यार्थ्यांनी तन्मयतेने सहभागी होत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे फायदे,मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याची सविस्तर माहिती देण्यात आली.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल चालतवड येथील सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली,आणि जागतिक योग दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी आवड निर्माण झाली असून,शाळेमधूनच आरोग्यदायी जीवनशैलीचा पाया घालण्यास मदत होत असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
जाहिरातीसाठी संपर्क:
मुख्य संपादक – दिनेश आंबेकर – 9022059782