दि : 22 जून 2025 रोजी खडकी ता.विक्रमगड येथील अंगणवाडीत एक आनंददायी उपक्रम राबविण्यात आला.मा.नखाते सर यांच्या वतीने व अविनाश कामडी (बरवाडपाडा) यांच्या विशेष प्रयत्नातून आणि उमेश वड सर आणि श्री पंकज मौळे यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम पार पडला.या उपक्रमांतर्गत अंगणवाडीतील चिमुकल्यांना पाटी, पेन्सिल आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या छोट्या बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि उत्साह क्षणभर का होईना पण सर्वांच्या मनाला भावणारा ठरला.समाजासाठी आपला वेळ,संसाधने आणि प्रेम देणाऱ्या सर्व मान्यवरांचे या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि आभार!
अशा सामाजिक कार्यातूनच खऱ्या अर्थाने एक संवेदनशील आणि सुजाण समाजाची निर्मिती होते……
जाहिरातीसाठी संपर्क :
मुख्य संपादक – दिनेश बा आंबेकर – 9022059782