दिनेश आंबेकर
मोखाडा : खोडाळा पैकी जोगलवाडी येथील अविता कवर या गरोदर मातेला वेळीच उपचार न मिळाल्याने आपले बाळ गमवावे लागले आहे. अशा पीडित कुटुंबांतील अविता कवर हिच्या घरी जि.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी भेट दिली. कवर कुटुंब राहत असलेले घर मोडकळीस आलेले असून पावसाच्या पाण्याने पूर्ण गळती लागलेली आहे.घराला दरवाजा सुद्धा नाहीत.त्यामुळे घराची डागडुजी करून नवीन दरवाजे बसविण्याची जबाबदारी प्रकाश निकम यांनी घेतली आहे.वर्षभर गाव पातळीवर रोजगार मिळत नसल्याने स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांपैकी एक कवर कुटुंब होय.उन्हाळ्यात रोजगार नसल्याने शहराकडे वीटभट्टीवर जाऊन काम करावे लागते.मजुरीचे पैसे घराच्या दुरुस्ती करीता खर्च करायचे की आयुष्य जगायला ठेवायचे,त्यातही वेळीच औषधोपचार होत नसल्याने मृत्यूचा सामना अशा दूहेरी संकटात सापडलेल्या अविता कवर हिचे राहते घर मोडकळीस आलेले आहे.घराला दरवाजे नसून लोखंडी पत्रा तर कुठे कपड्याने झाकलेले आहेत ही सर्व परिस्थिती पाहूनजिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून स्व खर्चाने कवर कुटुंबाच्या घरांचे छप्पर दुरुस्ती व नवीन दरवाजे बसवून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.यावेळी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदिप वाघ,निलेश झुगरे,स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.
जाहिरातीसाठी संपर्क:
मुख्य संपादक – दिनेश आंबेकर – 9022059782