दिनेश आंबेकर –
जव्हार : प्रवासी व कामगाराच्या समस्या,तक्रारी,सूचना यांचा स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा करण्यासाठी जव्हार आगारात ‘प्रवासी राजा दिन’ व ‘कामगार पालक दिन’ आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.२५ जून बुधवारी रोजी जव्हार आगारात हा उपक्रम राबविण्यात आला आहे.प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन उपक्रमांतर्गत संबंधित विभागाचे विभाग नियंत्रक वेळापत्रकानुसार जव्हार आगारात जाऊन सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारतील.तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत संबंधितांना आदेश देतील.तसेच दुपारच्या सत्रात त्याच आगारात ३ ते ५ या वेळेमध्ये त्या आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकूण घेऊन त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करतील.राज्यभरातील सर्व आगारात दर सोमवारी व शुक्रवारी या दोन्ही उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरूपामध्ये संबंधित आगारात द्याव्या लागणार आहेत.तसेच प्रवाशी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सोडविण्यासाठी या उपक्रमामुळे मदत होईल,प्रवाशांनी आपल्या तक्रारी सादर कराव्यात त्यामुळे याच कालावधीत जव्हार आगारात कामगार पालक दिन पाळण्यात येणार आहे.
जाहिरातीसाठी संपर्क –
मुख्य संपादक : दिनेशआंबेकर – 9022059782