उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड– संचलित जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा झडपोली, विक्रमगड येथे हि शाळा अंध व मतिमंद अश्या दोन विभागात २०१६ पासुन संस्थे अंतर्गत कोणत्याही प्रकारची फी न आकारता पूर्णतः मोफत चालवली जात आहे. या शाळेतून आता पर्यंत अनेक विद्यार्थी शिकून शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. तर काही विध्यार्थी उच्च शिक्षणा करिता बाहेर जिल्ह्यात आहेत ते आपले त्या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण करत आहेत. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे मोफत शिक्षण व निवासी व्यवस्था, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक, शिक्षण व पुनर्वसन, संगीत शिक्षण, हस्तकला, संगणक प्रशिक्षण, प्रशस्थ इमारत, भव्य क्रिडांगण, विद्यार्थ्यांचे योग्य संगोपन, निसर्गरम्य शालेय परिसर, शालेय परिसरात रुग्णालय, शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य हे सर्व विद्यार्थना मोफत देण्यात येते. विशेष म्हणजे विध्यार्थांच्या कला गुणांना वाव देण्यात येतो. तरी संस्थे कडून व शाळेकडून आहवान करण्यात येते की आपल्या परिसरात अंध व मतिमंद विध्यार्थी आढळून आल्यास शाळेला भेट जरूर द्यावी जेणेकरून असे विध्यार्थी हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. शाळेचा पत्ता:जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळा झडपोली, ता. विक्रमगड,जि.पालघर पिन क्रमांक 401605 संपर्क क्रमांक 90499251510, 8766700699.