उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
पालघर – प्रवेश यंदा १५ मे पासून ऑनलाईन स्वरूपात सुरु झाले आहेत. या प्रवेश प्रकियेचे सविस्तर वेळापत्रक संचालनालायच्या संकेतस्थळावर http://admission.dvet.gov.in जाहीर केलेले आहे.
यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी कामे विद्यार्थाना ऑनलाईन करता येणार आहेत. तसेच ही सर्व कामे आपल्या जवळच्या आयटीआयमध्ये जाऊन विद्यार्थाना माफक दरात करून मिळतील.
यावर्षी प्रवेशासाठी विक्रमगड आयटीआयमध्ये उपलब्ध व्यवसायांची संख्या ६ असून त्यामध्ये सुईंग टेक्नॉलॉजि (कर्तन व शिवणकाम ), कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग अससिस्टन्ट (कोपा), यांत्रिक डिझेल, संधाता (वेल्डर), इलेक्ट्रिशियन , टूल व डाय मेकर हे व्यवसाय प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यावर्षी विक्रमगड आयटीआयमध्ये एकूण १३२ जागांसाठी प्रवेश होणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मूळ कागदपत्रे सादर करून आपला प्रवेश कन्फर्म करावा लागतो. त्यामुळे आता अर्ज भरल्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहून अर्ज निश्चित करता येणार आहे. त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात पाठपुरावा त्या आयटीआयची यंत्रणाही करणार आहे.
यंदा काय बदल ….
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदविलेला दूरध्वनी क्रमांक आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तोच ठेवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना केंद्राच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करताना हा मोबाइल क्रमांक लॉगिन असणार आहे. त्यामुळे हॉल तिकीट, परीक्षा विषयक माहिती, तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे. यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरु ठेवणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे अर्जावर काळजीपूर्वक मोबाइल नंबर टाकावा लागणार आहे.
प्रवेशासंदर्भातील संपर्क:- मो. नं. ९३२६५३५१९६,९०९६०७०३९१,९६७३१११२६४,८९२८५१०७६७