दिनेश आंबेकर
दि – १८ जुन २०२५ रोजी,डहाणू तालुक्यातील पावन येथील दिलीप बसवत यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल वलसाड येथे दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान त्यांना 0+ रक्त गटाची तातडीने आवश्यकता भासली.ही माहिती मिळताच यारी दोस्ती ग्रुप सदस्य शैलेश तल्हा (वाणगाव) यांनी तत्काळ पुढाकार घेतला आणि वलसाड सिविल हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले.रक्ताची गरज भासलेल्या रुग्णासाठी वेळेत मदत करून शैलेश तल्हा यांनी सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले.त्यांच्या या कार्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आणि त्यांनी यारी दोस्ती ग्रुप व शैलेश तल्हा यांचे मन:पूर्वक आभार मानले.यारी दोस्ती ग्रुपचे हे सततचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून,तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.अशा प्रकारच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत.
“रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे.” या विचाराने प्रेरित होऊन यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य गरजूंना मदत करत राहोत,हीच सदिच्छा!
जाहिरातीसाठी संपर्क
मुख्य संपादक – दिनेश बा.आंबेकर – 9022059782