दिनेश आंबेकर
जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये दि.१७ रोजी सरपंच कल्पेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शिबिरचे आयोजित केले होते.त्या शिबिरामध्ये आधार कार्ड नवीन, अपडेट,आयुष्यमान भारत कार्ड, (PM JAY),जात प्रमाण पत्र,पीएम किसान,जन-धन खातेइत्यादी सेवा प्रत्यक्षात पुरविण्याचे नियोजन करण्यात आहे होते तेथील सर्व नागरिकांनि व शाळेतील मुलांनी संधीचा लाभ घेऊन शिबिर चांगल्या प्रकारे पार पाडले तरी या प्रसंगी कल्पेश विनायक राऊत,लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी, आयरे लोकनियुक्त सरपंच जयेंद्र धिंडा,उपसरपंच त्रिंबक रावते,ग्राम सदस्य – शंकर रावते,ग्राम सदस्य शंकर इल्हात,कुणाल सापटा,नितीन चौधरी,ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे,संदीप घेगड,किशोर कडू, जव्हार मंडळ अधिकारी तारगे, तलाठी विकास ठाकरे,मनीष तमखाणे प्रकल्प ऑफिस प्रतिनिधी बँक प्रतिनिधी,आधार केंद्र चालक, महा इ सेवा केंद्र चालक तसेच गावातील लाभार्थी ज्येष्ठ नागरिक मान्यवर उपस्थित होते.”क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा धरती आबा या अभिनव उपक्रम मध्ये ग्रामपंचायत मधील नागरिकांना आपल्याच ग्रामपंचायत मध्येच सर्व दाखले मिळावे यासाठी नागरिकांनी, तसेच शाळकरी मुलांनी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा.”
( लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत.)
जाहिरातीसाठी संपर्क
मुख्यसंपादक – दिनेश बा. आंबेकर – 9022059782