मुख्य संपादक – दिनेश आंबेकर
मोबाईल नंबर – 90220 59782
उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
मोबाईल नंबर – 8408845264
विक्रमगड – विक्रमगड तालुक्यातील एक व्यक्तिमत्व असलेले दैनिक अग्रलेख या वृत्तपत्राचे पत्रकार पालघर ग्रामीण प्रतिनिधी समीर आळशी यांना कल्याण येथे झालेल्या समारंभात आदर्श पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले. दैनिक अग्रलेखाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली व पालघर जिल्ह्यातील समस्या सतत लिखाणातून मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यांचे हे कार्य असेच पुढे चालू राहून त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने त्यांना दैनिक अग्रलेख वर्धापन दिन सोहळ्यात आदर्श पत्रकार देऊन गौरवण्यात आले.
