मुख्य संपादक – दिनेश आंबेकर, मोबाईल नंबर – 90220 59782
उपसंपादक – प्रशांत दाव्हाड, मोबाईल नंबर – 8408845264
जव्हार– जव्हार तालुक्यातील पिंपळशेत – कोतीमाळ या गावामधील शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव निमित्त जिल्हा परिषद शाळा कोतीमाळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ करण्यात आले. दप्तर,गणवेश,साहित्य वाटप करून पायाचे ठसे उमटवले. उपस्थीत पिंपळशेत /खरोंडा ग्रुप ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच मा. दिनेश जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. कमलेश पागी शिक्षक वर्ग मा. दिवे, मा. गवळी, पालक वर्ग इतर मान्यवर उपस्थित होते. सरपंच यांचे योग्य मार्गदर्शन शाळेतील मुलांसाठी लाभले.
आणि म्हणून यासाठी मान्यवर व गावातील ग्रामस्थानी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
