संपादक – दिनेश आंबेकर मोबाईल नंबर – 90220 59782
उपसंपादक – प्रशांत दाव्हाड मोबाईल नंबर 8408845264
विक्रमगड-विक्रमगड तालुक्यातील केंद्र शाळा विक्रमगड येथे इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.
विक्रमगड तहसीलदार श्रीम. चारुशीला पवार, नायब तहसीलदार म्हात्रे ,पत्रकार समीर आळशी, शाळेच्या मुख्याध्यापिका सहारे मॅडम,सुनील अधिकारी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेशोत्सव संपन्न झाला. यावेळी इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून ,विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्यावर पुष्प वर्षाव करून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करून त्यांनी शाळेत प्रवेश केला.
या प्रवेशनानंतर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व नवीन पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले .शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन गणवेश व नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
या कार्यक्रमात विक्रमगड तहसीलदार श्रीम. चारुशीला पवार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. सुनील अधिकारी सरांनी जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व विशद केले. नवीन शाळा नवीन गणवेश नवीन पुस्तके हे सर्व पाहून विद्यार्थ्यांना फारच आनंद झाला.
