संपादक – दिनेश आंबेकर
जि.प. शाळा बरवाडापाडा येथे शिवरुद्र सामाजिक संस्था, कांदिवली – मुंबई यांच्या सहकार्यातून आणि समाजसेवेच्या प्रेरणेतून तसेच अविनाश कामडी यांच्या प्रयत्नातून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वही,पेन आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी देवदूतासारखी धावून आलेली ही संस्था विद्यार्थ्यांसाठी आशीर्वाद ठरली.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आणि पालकांनी संस्थेच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली.या कार्यक्रमाला शिवरुद्र सामाजिक संस्था कांदिवली मुंबईचे सर्व कार्यकर्ते,तसेच ग्रामदार मंडळ बरवाडापाडाचे अध्यक्ष भरत जी मौळे,माजी अध्यक्ष अनिल जी मौळे,पंकज मौळे,विणू महाले,रामजी मौळे,अक्षय मौळे,नंदा खुरकुटे,तसेच सर्व सदस्य,पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोड शिरा व खाऊ देण्यात आला.गावातील पालकांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
मुख्य संपादक – दिनेश आंबेकर – 9022059782