दिनेश आंबेकर
जव्हार – भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशन स्कूल चालतवड येथे शाळेचा पहिला दिवस साजरा.सर्व प्रथम म्हणजे शाळेचा पहिला दिवस म्हणून सरस्वती मातेच पूजन करून या शाळेचा पहिला दिवस म्हणून साजरा केला.शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात.शाळेतलं प्रेम,मित्रांसोबत केलेली मस्ती,मैदानवरचे खेळ,सरांचे बोलणेे,पेपरला केलेली कॉपी,तास चालू असताना केलेली बडबड,सगळ आठवत आता.शाळेचे दिवस परत येत नाहीत.शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा,शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात.नवीन गणवेश धारण करायचे.चिखलामध्ये पाय ठेवत चालायचे.पाठीवर नवीन दप्तर घ्यायचे,अन शाळेचा पहिला दिवस घालवायचे.कोणालाही न बोलता शाळेत यायचे,हात जोडून,डोळे बंद करून प्रार्खना म्हणायचे,मधल्या बाकावर गुपचूपपणे बसायचे,अन शाळेचा पहिला दिवस घालवायचे.नवनवीन पाठ्यपुस्तक घ्यायचे,त्याच्याच सुगंधात दरवळायचे,त्यातील चित्रे पाहत बसायचे,अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.दुपारच्या सुट्टीत सरकारी भात खायचे,त्या हापस्याचे घोटभर पाणी प्यायचे,एखाद्या मित्रासोबत वर्गात यायचे,अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.शेवटी वर्गात बसुन घराची आठवण काढायचे,एकमेकांकडे बघुन खुप-खुप रडायचे,घंटा वाजल्यावर घरी पळत सुटायचे,अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.तसेच चालतवड येथे भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशन स्कूल चालतवड येथे शाळेचा पहिला दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात सहभागी शाळेचे सर्व कर्मचारी तसेच प्रिन्सिपल जोशना मॅडम,हरेश सर,करण सर,हर्षला मॅडम,किरण सर,गीता मॅडम,रोहित सर,मालती मॅडम,प्रणाली मॅडम आणि मुलांचे आई वडील तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मुख्यसंपादक – दिनेश आंबेकर – 9022059782
उपसंपादक – प्रशांत दाव्हाड – 8408845264