आपल्या वाढदिवसा निमित सामाजिक दायित्व जप्त प्रणित सीताराम बुजड यांनी स्वतःरक्त दान करून दिला संदेश…
जव्हार :- आज दि.१२ शनिवार रोजी जव्हार तालुक्यातील पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्तपेढी ही एकमेव पालघर जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढी असुन ग्रामीण भागातील रुग्णांना एक वरदान ठरत असुन आज जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत पैकी पाथर्डी या गावातील प्रणित सीताराम बुजड यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त रक्त दान करून केली मदत.रुपाली ताबडा वय वर्ष २४ या महिला रुग्णांला A पोजेटीव्ह रक्ताची अत्यंत तातडीचे अर्जंट गरज रुग्णांला तिच्या शरीरात रक्त कमी असल्याने तिला पुढील उपचारा करिता A पॉझिटिव्ह अत्यंत रक्ताची गरज असल्याची माहिती जितेश लोखंडे व हितेश वातास सामाजिक कार्यकर्ते यांनी युवा आदिवासी संघ रक्तदान गृपच्या माध्यमातून युवा रक्तदात्यांना आवाहन केले असता जितेश लोखंडे व हितेश वातास सामाजिक कार्यकर्ते ना पतगशहा कुटीर रुग्णालयात सम्पर्क करा असा मेसेज व्हाट्सअँप ग्रुप सोशल मीडियाची माहिती मिळतात युवा आदिवासी संघ जव्हार गृपचे सदस्य प्रणित सीताराम बुजड यांनी स्वतः रक्तपेढी येऊन एक पिशवी रक्तदान करून सदर रुग्णांना मददत केली याबाबत त्याचे सामाजिक दायित्व बघून या प्रणित सीताराम बुजड या रक्तदात्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात आहे व कौतुक होत आहे. तसेच सदर युवा आदिवासी संघ रक्तदाता गृप एक हात मद्यतीचा उद्देशाने तयार करण्यात आला असून हा उद्देश सफल होत असल्याचे सर्वच गृप मधील सभासद कडून बोलले जात आहे.