दिनेश आंबेकर –
जव्हार : दि.16 जून 2025 – तालुका जव्हार येथील साखर शेत नं.1केंद्र साखरशेत जिल्हा पालघर येथील शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या प्रारंभानिमित्ताने आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पावसाच्या सरींच्या साक्षीने वर्ग व वरांड्यात रंगलेल्या या कार्यक्रमात नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत आनंदात व उत्साहात करण्यात आले.यंदा इयत्ता पहिलीत सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून पहिल्याच दिवशी सातही विद्यार्थी पालकांसह उपस्थित होते.सर्व विद्यार्थी गणवेशात सजलेले होते.शाळेच्या सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट तयारी करून वर्ग सजावट,साफसफाई,उपस्थिती आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन उत्तमरीत्या पार पाडले.विद्यार्थ्यांना शाळेत स्वागत करताना त्यांना गट विकास अधिकारी श्री चित्ते साहेब व गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांच्या हस्ते गणवेश,वह्या,पुस्तके व गोडधोड पदार्थ देण्यात आले.प्रत्येक नवोदिताच्या पहिल्या पावलाचे स्मरण म्हणून पावलांचे ठसे कागदावर घेण्यात आले तसेच “नवागतांचा वृक्ष” संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे वापरून वृक्ष निर्मिती करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी दत्तात्रेय चित्ते,गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे,विस्तार अधिकारी मनीषा डांगे,पंचायत समितीचे मनोज कामडी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वनाथ घुटे,केंद्रप्रमुख मधुकर भोये यांची उपस्थिती लाभली होती.गटशिक्षणाधिकारी श्रीमती विजया टाळकुटे यांनी नवोदित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.गटविकास अधिकारी चित्ते यांनी आपल्या भाषणातून पालक,शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरित करत तालुक्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त केली.पालक मेळाव्याच्या माध्यमातून पालकांनाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.या प्रवेशोत्सवात प्रभातफेरी,तसेच पंचायत समितीच्या पथनाट्य पथकाचे गीत व पथनाट्य व सावित्री बाई फुले यांचे प्रतिकात्मक भूमिका कुमारी ईशानी गवळी हिने उत्कृष्ट साकारली हे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक गवई भोये,कुवरा जी,भोये जी,घुटे जी, मुरमे जी,माळी जी,शेख जी,गावित जी,चौधरी जी आदी शिक्षक उपस्थित होते.एकंदरीत प्रवेशोत्सवाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली असून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात प्रेरणा देणारा हा दिवस ठरला.
मुख्यसंपादक – दिनेशआंबेकर -9022059782.जाहिरातीसाठी संपर्क.