दिनेश आंबेकर
जव्हार :- दि. १७ जव्हार पासून १४ की मी अंतरावर असलेली ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे येथील विक्रम बागुल आणी काजल.यांनी महिलांना शिवण कोर्स बद्दल माहिती दिली व शिवण कोर्स साठी मंजुरी घेतली.बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा.ता जव्हार.जि,पालघर.यांच्यामार्फत ५ मार्च ते १२ जून २०२५ या कालावधीत एकूण तीन महिन्याचे शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.डॉन बॉस्को सामाजिक संस्था कडून प्रशिक्षणार्थी महिलांना ९० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल दि.१६ जुन २०२५ रोजी निरोपसमारंभ व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला . सरपंच वैशाली अशोक धोडी तसेच बॉस्को समाजिक संस्थेचे उप संचालक,मा.ब्रदर सविओ डिमेलो यांच्या हस्ते ३४ महिलांना संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात आले.नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेट लिमिटेड शासनाचं प्रमाणपत्र देण्यात येईल.निरोप सभारंभ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे कौलाळे लोकनियुक्त सरपंच वैशालीताई धोडी यांनी बास्को सामाजिक सेवा संस्था पूर्ण टिमचे व शिवण काम प्रशिक्षक यांचे मनःपूर्वक आभार मानले व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना मार्गदर्शन करून महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित डॉन बॉस्को सामाजिक संस्थेचे उपसंचालक ब्रदर सेवीओ डिमोलो,कॉर्डिनेटर चंदू कदम, विक्रम बागुल,पराग महाले,काजल वाघचौरे,शिवणकाम प्रशिक्षक विजय भोरे.अशोक धोडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
“जव्हार तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून डॉन बॉस्को सामाजिक संस्था वाळवंडा ही आरोग्य,सामाजिक,कृषी, शैक्षणिक,असे विविध प्रोजेक्ट वरती काम करते परंतु कौलाळे ग्रामपंचायत मधील महिलांना प्रशिक्षण मिळावे यासाठी मागणी केली असून तेआमच्या मागणीला विनंती देऊन कौलाळे ग्रामपंचायत मध्ये प्रथम तीन महिन्याचे प्रशिक्षण आज पूर्ण होत आहे त्याबद्दल सर्व संस्थेचे पूर्ण टीमचे आभारी व्यक्त करते.(वैशाली धोडी.सरपंच ग्रामपंचायत कौलाळे.)
“डॉन बॉस्को सामाजिक संस्था वाळवंडा यांनी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे आदिवासी पाड्यात महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण दिल्याबद्दल मी संस्थे चे व संचालक मा.फादर जेसू रॉबिनशन.यांचे आभारी आहे.तसेच आम्हाला लाभलेले प्रशिक्षक विजय भोरे यांनी अतिशय साध्या भाषेत चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.विजय जी तुमची खूप आठवण येईल आम्हाला . भविष्यात स्वतःच्या पायावर शिवणकाम च्या माध्यमातून आमच्या परिवाराला हातभार लागेल तसेच आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू.(आशा प्रवीण भोये प्रशिक्षणार्थी.)
“ज्या वेळेस बॉस्को सामाजिक संस्थे कडून मला सूचना दिल्या की शिवणकाम प्रशिक्षण कौलाळे ग्रामपंचायत मध्ये घेण्याच्या विचार केला परंतु थोडीशी मनामध्ये भीती होती कामाच्या दिवसांमध्ये महिलांचा प्रतिसाद भेटतो की नाही परंतु तीन महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत एकूण ३४ सहभाग नोंदवून आज प्रशिक्षण पूर्ण केले.सर्व महिला आणी मुलींनी वेवस्तीत समजून घेतलं आणी मला सहकार्य केल्या बद्दल आभारी आहे.तसेच ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे सरपंच वैशाली धोडी यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी ग्रामपंचायतचा आभारी आहे.(विजय भोरे शिवणकाम प्रशिक्षक.)