उपसंपादक – प्रशांत दाव्हाड

पालघर जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराचे कंत्राट इस्कॉन या खाजगी कंपनीला देण्याचा जिल्हा परिषदेचा डाव आज 12 जून 2025 रोजी सीटू युनियन आणि जनवादी महिला संघटनेच्या जबरदस्त मोर्चाने उधळून लावला.
आज सकाळी 10 वाजेपासून शालेय पोषण आहार कर्मचारी आपले लाल झेंडे घेऊन, आणि पालकांचे प्रतिनिधित्व करत जमसंच्या महिला आपले पांढरे झेंडे घेऊन पालघर जिल्हा परिषदेसमोर जमायला लागल्या. जोवर जिल्हा परिषद आपला निर्णय मागे घेत नाही तोवर आम्ही तेथून उठणार नाही असे ठरवून दोन दिवस राहण्याच्या तयारीने सर्व आल्या होत्या.
मात्र 3000 हून अधिक महिलांच्या या मोर्चाचे उग्र रूप पाहून शिक्षणाधिकाऱ्यांनी जुनेच कर्मचारी कायम राहतील आणि खाजगी कंत्राट दिले जाणार नाही, असे ताबडतोब लेखी दिले. असा जबरदस्त विजय मिळवून संघटनेच्या विजयाच्या घोषणा देत महिला परतल्या.
मोर्चाचे नेतृत्व सीटूचे राज्य सचिव आमदार विनोद निकोले, तसेच किरण गहला, रडका कलांगडा, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखाना, लक्ष्मण डोंबरे, सुनिता शिंगडा, प्राची हातिवलेकर, प्रकाश चौधरी, रामचंद बरफ, दामू बात्रा, गुलाब वाढिया इत्यादींनी केले.