दिनेश आंबेकर –
दि.२७/०६/२०२५रोजी जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत कोरतोड पैकी जि.प.शाळा सावरपाडा येथील विध्यार्थ्यांना देवमाणूस कै.पांडुरंग त्रिंबक घेगड सर वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्रा मार्फत जवहार नवोदय मार्गदर्शन पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले.सर्वात प्रथम शिक्षण ज्ञानाची मशाल क्रांतिजोती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली सर्व जि प शाळा सावरपाडा विध्यार्थ्यांनी व शिक्षक वृंद यांनी देवमाणूस कै.पांडुरंग त्रिंबक घेगड सर वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र कमेटीचे स्वागत करण्यात आले वाचनालय चे सभासद सुरेश बांबरे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून कार्यक्रमाला सुरवात करता ना देवमाणूस कै.पांडुरंग त्रिंबक घेगड सर यांनी केलेल्या कार्य व त्यांच्या आयुष्यातील जीवन प्रवासाची ओळख करून देत आठवणीला उजाळा दिला त्यानंतर विध्यार्थ्यांना जवाहर नवोदय मार्गदर्शन पुतस्तके देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या विध्यार्थ्यानी अभ्यास कसा करावा त्याकरिता महत्वाचे मार्गदर्शन करण्यात आले वाचनालयचे अध्यक्ष गोविंद अवतार सर यांनी सर्व विध्यार्थ्यांचे वाचन व गणित मध्ये पाढे विचारून विध्यार्थी चे बोधिकमत्ता तपासून पहिली असता सर्व विध्यार्थी हुशार व अभ्यासू आढळून आले.कोगदा गावातील विध्यार्थीना नववी ते दहावी विध्यार्थी तसेच नवोदय विध्यार्थी व एकलव्य विध्यार्थी यांचे बिना पैश्यात क्लासेस घेत असून वेळ कडून जि प शाळा सावरपाडा येथील विध्यार्थीचे देखील बिना मानधन क्लासेस शनिवार, रविवार घेण्यासाठी येणार असल्याचे गोविंद अवतार यांनी आश्वासित केले.जि.प शाळा सावरपाडा येथील जवाहर नवोदय परीक्षा करता बसणाऱ्या मगश्रुतिका भोरे,तृप्ती बांबरे,गुंजन भोरे,गौरेश गोविंद,ऋतुराज माळी विध्यार्थी ना मार्गदर्शन पुस्तिका देऊन परीक्षा करता शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर विध्यार्थीना जवाहर नवोदय मार्गदर्शन पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले तेव्हा सर्व विध्यार्थ्यांनच्या चेहऱ्यावर आनंदाचा जनसागर चे वातावरण पहाव्यास मिळाले त्यांनतर शाळेतील शिक्षक घनशाम भोये सर यांनी सर्व वाचनालय कमेटीचे आभार मानून कार्यक्रम ची सांगता करण्यात आली.यावेळी शिक्षक वृंद घनश्याम भोये,अलका गावंढा,दर्शना तराळ,कोरतोड ग्रामपंचायत पोलीस पाटील निर्मला माडी तसेच वाचनालयचे अध्यक्ष गोविंद अवतार,सल्लागार सुरेश भोये जेष्ठ सल्लागार,जेष्ठ सल्लागार दामू भोये, कार्याध्यक्ष हेमंत घेगड,पत्रकार प्रमोद मौळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
