
संपादक : दिनेश आंबेकर
दि.९ जुनं २०२५ रोजी, डहाणु तालुक्यातील धाणिवरे गावातील १२ वर्षीय ईश्वरी हांडवा यांना वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचाराच्या दरम्यान त्यांना तातडीने B + रक्ताची आवश्यकता भासली.डोनर मिळवण्यासाठी यारी दोस्ती ग्रुपकडे मदतीची मागणी करण्यात आली.समाजसेवेची तळमळ आणि माणुसकीचे नाते जपणारे यारी दोस्ती ग्रुपचे दोन सदस्य अविनाश तुकाराम कामडी जव्हार किरण विष्णू बिज धुंदलवाडी यांनी तत्काळ पुढाकार घेत,वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे जाऊन रक्तदान करून ईश्वरी हांडवा यांच्या जीवाला दिलासा दिला.आजच्या काळात रक्ताची वाढती मागणी आणि अपुरा रक्तपुरवठा हे गंभीर प्रश्न बनले आहेत.अशा परिस्थितीत यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य नेहमीच निस्वार्थ भावनेने आणि तातडीने रुग्णांसाठी रक्तदान करण्यासाठी सज्ज असतात. यारी दोस्ती ग्रुप हा एकमेव संदेशावर रुग्णांच्या मदतीसाठी तयार होणारा समूह आहे, जो माणुसकीच्या नात्याने सामाजिक कर्तव्य निभावतो.या महान कार्याबद्दल यारी दोस्ती ग्रुप पालघर जिल्ह्यातील सर्व तरुणांना आवाहन करतो की, समाजकार्याची आवड निर्माण करा आणि यारी दोस्ती ग्रुपमध्ये सामील होऊन गरजूंना मदत करण्यासाठी एकत्र येऊन कार्य करा.एकत्र येवून आपण समाजात चांगले आणि सकारात्मक बदल घडवू शकतो.
( यारी दोस्ती ग्रुप – पालघर.)